logo

कोहिनुर परिवाराची उमेदवाराचे वडील राधाकृष्ण विखे यांनी भेट घेऊन मतदानाचे केले आवाहन....

अहमदनगर (२७.४.२४)
लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज कापडबाजारातील कोहिनुर या जगप्रसिध्द वस्त्रदालनाला उमेदवाराचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन कोहिनुर परिवाराला सुजय विखेंना मत देऊन निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी संचालक अश्विन गांधी, मॅनेजर योगेश गांधी, रवींद्र भळगट, महेश बोगा, अशोक शेंडे, रमेश गुज्जा, अशोक दिवटे यांच्यासह कोहिनुर परिवारातील सर्व कर्मचारी कामगार यासह महायुतीचे पदाधिकारी अभय आगरकर, वसंत लोढा, बाबासाहेब वाकळे, सचिन पारखी आदी उपस्थित होते.
यावेळी गांधी यांनी कै. प्रदीप शेठ गांधी यांच्या मागील निवडणुकीच्या आठवणी सांगितल्या व आपली मनोगते व्यक्त केली. राधाकृष्ण विखेंनी मनोगत व्यक्त करून सुजय विखेंना निवडून देण्याचे आवाहन केले.

0
41 views